जिज्ञासा ट्रस्टने या उन्हाळाच्या सुट्टीत शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी संशोधन मार्गदर्शन उपक्रम

जिज्ञासा ट्रस्टने या उन्हाळाच्या सुट्टीत शालेय आणि कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी संशोधन मार्गदर्शन उपक्रम आयोजित केला आहे. आपल्या
परिसरातील कुठल्याही सामाजिक प्रश्नाचे (उदा. घनकचरा विल्हेवाट, आरोग्य, बाल सुरक्षा, वृद्धांची काळजी आणि वाहतूक व्यवस्था ) इ. शास्त्रोक्त
पद्धतीने उकल करण्याची संधी, या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना मिळू शकेल. यासाठी त्यांना तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन सुद्धा मिळणार आहे.
माध्यमिक आणि
उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रमाच्या बदलत्या स्वरुपात विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेची कसोटी बघितली जाणार आहे. खाजगी क्लासेसचे गुण
मिळवण्याचे तंत्र या बदलत्या परीक्षा पद्धतीत कमी पडणार आहे. विविध विषयातील विशेष ज्ञान स्वानुभवाने आणि अभ्यासाने आत्मसात करण्याची
कला प्रकल्प उपक्रमातून विद्यार्थ्यांना प्राप्त होऊ शकेल. त्याच बरोबर राष्ट्रीय बाल विज्ञान परिषद, होमी भाभा बाल विज्ञान परीक्षा, या सारख्या इतर
उपक्रमांचा सराव सुद्धा या सुट्टीत करता येईल.
५ वी ते १२ वीतील इच्छुक विद्यार्थ्यांनी ३० एप्रिल पर्यंत जिज्ञासा कार्यालयात यासाठी नोंदणी करावी.
आपल्या प्रस्तावित प्रकल्पाची रूपरेखा २०० शब्दात मांडून १० मे पर्यंत द्यावा.
सुमारे ५०० – १००० शब्दातला संपूर्ण प्रकल्प प्रत देण्याची शेवटची
तारीख ३० मे आहे.

अधिक माहितीसाठी जिज्ञासा ट्रस्टशी २५४०३८५७ संपर्क
साधावा अस आवाहन करण्यात आल आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading