येत्या सोमवारी पहाटे ईशान्य क्षितिजावर स्वरमंडळ तारकासंघातून होणारा उल्कावर्षाव पहायला मिळणार

येत्या सोमवारी दि. २२ एप्रिल रोजी पहाटे ईशान्य क्षितिजावर स्वरमंडळ तारकासंघातून होणारा उल्कावर्षाव खगोलप्रेमीना अभिजित तारकेजवळ
पहायला मिळणार असल्याचे खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितले. याविषयी अधिक माहिती सांगतांना सोमण म्हणाले की हा
उल्कावर्षाव ‘ लिराइडस् उल्कावर्षाव ‘ म्हणूनही ओळखला जातो. या दिवशी पृथ्वी सी/ १८६१ थॅचर या धूमकेतूच्या मार्गातून जात असते. ५ एप्रिल
१८६१ रोजी या धूमकेतूचा शोध थॅचर यांनी लावला. हा धूमकेतू दर ४१५ वर्षानी सूर्याला भेट देत असतो. दरवर्षी २२ एप्रिलला हा उल्कावर्षाव
पहायला मिळतो. तासाला १० ते १२ उल्का सेकंदास ४८ कि. मीटर यावेगाने पडत असतात असेही दा. कृ.सोमण यांनी सांगितले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading