प्रचार फेरी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे यांनी शिवसेना आयोजित नवरात्र उत्सवाला भेट देऊन कळवण उडवून दिली खळबळ

कोपरी येथे शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या चैत्र नवरात्र उत्सवाच्या मंडपात राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे यांनी प्रवेश करून देवीचे दर्शन घेऊन एकच खळबळ उडवून दिलि. ठाणे लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आनंद परांजपे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांची प्रामुख्याने लढत शिवसेनेच्या राजन विचारे यांच्याशी होत आहे. काल आनंद परांजपे यांचा कोपरी भागात दौरा होता. या दौऱ्या दरम्यान संत तुकाराम मैदानात सुरू असलेल्या नवरात्र उत्सव जवळ आनंद परांजपे आले असता, त्यांनी मैदानातील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या प्रतिमेला वंदन करत नवरात्र उत्सवाच्या परिसरात प्रवेश केला त्यांना अचानक पाहून मंडपात उपस्थित असलेल्यांना याचा धक्का बसला.परांजपेंना भेटण्यासाठी शिवसैनिक पुढे आले नाहीत. मात्र काही जणांनी त्यांना लांबूनच हात केला तर काहीनी स्मितहास्य केले. परांजपे देवीची पुजा करुन पुढे आपल्या प्रचाराला निघून गेले, त्यांच्या या धक्क्यामुळे कार्यकर्तेही चक्रावून गेले होते. खासदार राजन विचारे यांनी ही काल ठाण्यात प्रचार फेरी काढली होती. आनंद दिघे यांच्या शक्ती स्थळापासून सुरू झालेली ही प्रचार फेरी पाचपाखाडी येथील शिवसेना शाखेसमोर विसर्जित झाली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading