आमदार संजय केळकर यांनी अचानक आनंदनगर बस आगाराला भेट दिल्यानं अधिका-यांची तारांबळ

ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनी अचानक आनंदनगर बस आगाराला भेट दिल्यानं अधिका-यांची तारांबळ उडाली. कर्मचा-यांच्या आग्रहाखातर आमदार संजय केळकर यांनी अचानक ही भेट दिली. आनंदनगर बस आगारामध्ये चालक वाहकांना प्राथमिक सुविधाही उपलब्ध नसल्यानं आमदार केळकर यांनी अधिका-यांना चांगलेच धारेवर धरले. केळकर यांनी आगारातील शौचालय, चालक-वाहकांची विश्रामाची जागा, बसण्यासाठी जागा, पाणी पिण्याची व्यवस्था आदी विविध ठिकाणची पाहणी केली. पाणी साठवणा-या टाकीत किडे, शौचालयात येणारी दुर्गंधी याबाबत केळकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला. गाडीचा हिशोब वाहकाला बाहेर बसूनच द्यावा लागतो. ठेकेदार आणि त्यांच्या माणसांची मनमानी यामुळं त्रस्त असल्याच्या तक्रारी कर्मचा-यांनी केळकर यांच्या कानावर घातल्या. कोणतीही ड्युटी केव्हाही लावणे, कर्मचा-यांना अपमानास्पद वागणूक असे प्रकार कर्मचा-यांनी केळकर यांना सांगितले. आमदार केळकर यांनी यावरून अधिका-यांना चांगलेच फैलावर घेतले. यापुढे अपमानास्पद वागणूक दिल्यास खपवून घेतलं जाणार नाही असं सांगून ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची भूमिका केळकर यांनी व्यक्त केली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading