ठाण्यामध्ये प्री नवरात्री सेलिब्रेशन २०१८ चं आयोजन

ठाण्यामध्ये प्री नवरात्री सेलिब्रेशन २०१८ चं आयोजन करण्यात आलं होतं. कलाकृती आर्टस् ॲण्ड इव्हेन्टसचे कश्यप बौपा यांनी प्री नवरात्री सेलिब्रेशन २०१८ या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. या कार्यक्रमामध्ये ठाण्यातूनच नव्हे तर पुणे, अंधेरी, घाटकोपर, मुलुंड, बोरिवली अशा विविध ठिकाणाहून गरबा प्रेमी आले होते. आकर्षक वेषभुषा घालून गरबा खेळत या सर्वांनी कार्यक्रमात रंगत आणली. एम टीव्ही रॉक ऑन विनर नैतिक नागदा तसंच आमदार निरंजन डावखरे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात गरबा खेळणा-यांना आकर्षक रोख पारितोषिक तसंच एक ग्रॅम सोन्याचे नाणे देण्यात आले. उन्नती म्युझिकल बँडच्या साथीनं संजय चव्हाण आणि मिताली मेहता यांनी एकापेक्षा एक गाणी सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading