ठाणे, भिवंडी, कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी येत्या मंगळवारपासून नामनिर्देशन पत्रं स्वीकारली जाणार

ठाणे लोकसभा मतदारसंघात २९ एप्रिलला मतदान होणार असून या निवडणुकीसाठी २ एप्रिलपासून नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. येत्या मंगळवारी म्हणजे २ एप्रिलला निवडणुकीची अधिसूचना प्रसिध्द होणार असून ९ एप्रिलपर्यंत नामनिर्देशन पत्रं दाखल करता येतील. नामनिर्देशन पत्रांची छाननी १० एप्रिलला होणार असून १२ एप्रिल हा नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा अंतिम दिवस असल्याचं जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी सांगितलं. तर मतमोजणी २३ मे ला होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading