दिव्यांगांनी अनुभवली व्हीव्हीपॅट यंत्राची कार्यप्रणाली

लोकसभा निवडणुकीकरता मतदानाच्या दिवशी वापरण्यात येणा-या व्हीव्हीपॅट यंत्राची कार्यप्रणाली दिव्यांगांनी अनुभवली. विधानसभा मतदारसंघ १४६ आणि १४८ मधील दिव्यांग व्यक्तींना व्हीव्हीपॅट यंत्राचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं. स्वीप अंतर्गत शहरातील प्रमुख महाविद्यालयं, प्रमुख प्रशिक्षण प्रबोधिनी, औद्योगिक संस्था, राजकीय पक्ष आणि प्रसिध्दी माध्यमांना या व्हीव्हीपॅट यंत्राची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली आहेत. काल त्याचा अनुभव दिव्यांगांनी घेतला. लोकसभा निवडणुकीत सर्व मतदान केंद्रांवर व्हीव्हीपॅट यंत्रं बसवली जाणार आहेत. ईव्हीएम मशिनवर मतदान करताना मतदानाचं बटन दाबल्यावर नक्की कोणाला मतदान झालं हे या व्हीव्हीपॅट यंत्रावर पाहता येणार आहे. या यंत्रातून एक स्लीप बाहेर पडणार असून ही स्लीप मतपेटीत सीलबंद होणार आहे. या व्हीव्हीपॅट मशिनमुळे मतदारांना आपण दिलेलं मत नक्की कोणाला गेलं याची खातरजमा करण्याची संधी मिळणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading