महापालिकेची कर संकलन केंद्रं उद्या सकाळी १० ते रात्री ८ सुरू राहणार

नागरिकांना कर भरण्यासाठी उद्या रविवार असतानाही महापालिकेची कर संकलन केंद्रं सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सुरू राहणार आहेत. २०१८-२०१९ या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर, पाणी देयकं आणि इतर कर भरण्यासाठी ही कार्यालयं सुरू राहणार आहेत. महापालिकेची सर्व प्रभाग समिती कार्यालय आणि उपप्रभाग कार्यालयं उद्या म्हणजे ३१ मार्च रविवारी सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सुरू राहणार आहेत. महापालिका आयुक्तांनी ५०० कोटींच्या कर वसुलीचं उद्दिष्ट समोर ठेवलं होतं. मालमत्ता कर वसुली कारवाई अंतर्गत सर्व प्रभाग स्तरावरून ३३०० मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून यापोटी १५ कोटी रूपये वसूल करण्यात आले आहेत तर अडीच हजार व्यावसायिक गाळ्यांना सील ठोकण्यात आलं असून त्यांच्याकडून १३ कोटी रूपये वसूल करण्यात आले आहेत. महापालिकेच्या thanecity.gov.in  या संकेतस्थळावरही ऑनलाईन कर भरण्याची सुविधा महापालिकेनं उपलब्ध करून दिली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading