राम मारूती रस्त्यावर बेवारस बॅगेनं उडवली खळबळ

ठाण्यामध्ये राम मारूती रस्त्यावर एक बेवारस बॅग मिळाल्यानं काही काळ खळबळ उडाली होती. नमस्कार हॉटेलजवळ ही बेवारस बॅग पडली होती. याची माहिती पोलीसांना मिळताच पोलीसांनी बॉम्ब शोधनाशक पथकास पाचारण केलं. बॉम्ब शोधनाशक पथकातील कर्मचा-यांनी या बॅगेची चाचपणी केली. चाचपणीनंतर या बॅगेत धोकादायक काही नसल्याचं लक्षात आल्यानंतर ही बॅग उघडण्यात आली. त्यावेळी या बॅगेमध्ये पोलीसांना एक मोबाईल सापडला. त्यामुळं सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. बॅगेची तपासणी होईपर्यंत वाहतूक रोखून धरल्यामुळं काही काळ या परिसरात वाहतूक कोंडी झाली होती.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading