देवधर संस्कार वर्गातर्फे आगळ्या वेगळ्या पध्दतीने होळी साजरी

देवधर संस्कार वर्गातर्फे आगळ्या वेगळ्या पध्दतीने होळी साजरी करण्यात आली. होळीचं महत्व मुलांना समजावं यासाठी ही होळी साजरी केली जाते. ३ ते ६ वयोगटातील मुलं परिसरातील वाळलेली पानं, कडबा असा कचरा एकत्र करतात आणि कापूर टाकून छोटीशी होळी पेटवतात. पुरणपोळी, नारळ अर्पण करून माजी विद्यार्थिनींच्या हातून शिक्षिकांच्या मार्गदर्शनाखाली होळी पेटवली जाते. यावेळी होळीचं महत्व मुलांना सांगितलं जातं. त्यानंतर मुलं आणि शिक्षक मिळून भेळ तयार केली जाते. नैसर्गिक रंग हळद, बीट, पालक, कुंकू यापासून होळी खेळली जाते. यात एकमेकातील भांडण, रूसवे विसरून सर्वजण रंगात रंगून जातात. यामध्ये फक्त भारतीय बनावटीच्या पिचका-या वापरल्या जातात. अशात-हेनं एकात्मतेच्या रंगात रंगून मैत्रीची भेळ खाऊन खूप चांगल्या आठवणी घेऊन पालक, शिक्षक आणि लहान मुलं होळीचा सण साजरा करतात.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading