गोवा स्वीमथॉन सागरी जलतरण स्पर्धेत स्टारफीशच्या जलतरणपटूंची यशस्वी कामगिरी

गोवा येथे नुकत्याच झालेल्या गोवा स्वीमथॉन सागरी जलतरण स्पर्धा आणि सनक्रॉक ते गेटवे ऑफ इंडिया येथे झालेल्या सागरी जलतरण स्पर्धेत ठाण्यातील स्टारफीश स्पोर्टंस् फौंडेशनच्या जलतरणपटूंनी विविध पदकं पटकावित पुन्हा एकदा कौतुकाची थाप मिळवली आहे. तरण तलाव आणि समुद्र या दोन्हीचा अनुभव जलतरण पटूंजवळ असावा यासाठीच स्टारफीश मुलांना सागरी जलतरण स्पर्धेत सहभागी करत असल्याचं कैलास आखाडे यांनी सांगितलं. सनक्रॉक ते गेटवे ऑफ इंडिया येथे झालेल्या ५ किलोमीटरच्या जलतरण स्पर्धेत पृथ्वीराज कांबळे, साधना तापकीर यांनी सातवा तर हर्ष पाटील याने १०वा क्रमांक पटकावला. २ किलोमीटरच्या स्पर्धेत नील वैद्य यानं पाचवा क्रमांक पटकावला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading