पोलीस निरिक्षक अनुजा घाडगे यांना पोलीस आयुक्तांच्या हस्ते प्रशंसा पत्रक

पोलीस निरिक्षक अनुजा घाडगे यांना पोलीस आयुक्तांच्या हस्ते प्रशंसा पत्रक देऊन गौरवण्यात आलं. ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता असोसिएशनचे अध्यक्ष दत्ता घाडगे यांच्या अनुजा घाडगे या पत्नी आहेत. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागात कार्यरत असलेल्या अनुजा घाडगे यांना महात्मा फुले पोलीस ठाण्याअंतर्गत एका गुन्ह्याच्या तपासात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल ठाणे पोलीस आयुक्तांकडून प्रशंसा पत्रक देण्यात आलं. उत्कृष्ट गुन्हे तपास आणि गुन्हे दोष सिध्द होण्यासाठी चांगली कामगिरी करणा-या ११२ पोलीस अधिकारी-कर्मचा-यांमध्ये त्या एकमेव महिला पोलीस अधिकारी आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading