लाचलूचपप्रतिबंधक विभागात काम करणाऱ्या एका पोलिसाच्या विधवा पत्नीला ६४ लाखाहून अधिक रक्कमेची नुकसान भरपाई

लाचलूचपप्रतिबंधक विभागात काम करणाऱ्या एका पोलिसाच्या विधवा पत्नीला ६४ लाखाहून अधिक रक्कमेची नुकसान भरपाई मिळाली आहे. त्यांच्या पतिचे २०१७ मध्ये अपघाती निधन झालं होत. मोटार वाहन प्राधिकरणाचे अध्यक्ष अभय मंत्री यांनी हा निकाल दीला आहे. बेस्टने अर्ज दाखल केल्या पासुन आत्तापर्यंत ७ टक्के दराने यावर व्याजही द्यावे असे आदेशही न्यायालयानं दिले आहेत. श्रुतीका महाडीक यांनी नुकसान भरपाई मागणारा अर्ज सादर केला होता. सध्या त्या पोलिस कॉनस्टेबल आहेत. सचिन महाडीक हे सकाळच्या सुमारास सहकाऱ्याबरोबर दूचाकी वरुन कुर्ल्याला येत होते त्यावेळी भांडूपमध्ये मागुन येणाऱ्या बेस्ट बसन त्यांच्या दुचाकीला मागुन जोरदार धडक दिली यामध्ये गंभीर जखमी झालेल्या सचिन महाडीक यांचा मृत्यू झाला. महाडीक यांच्यावर संपुर्ण कुटूंब अवलंबून असल्या मुळे श्रुतीका महाडीक यांनी ८० लाख नुकसान भरपाईचा दावा दाखल केला होता. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकल्यावर हा अपघात बेस्ट चालकाच्या निष्काळजीपणामुळे झाल्याचे मान्य केलं. नुकसान भरपाईतील ४० लाख रुपये हे मुलाच्या नावाने ठेवावेत आणि त्याचं व्याज आईला द्यावत असे असदेश दिले आहेत. या प्रकरणी महाडीक यांच्यातर्फे टिल्लू यांनी तर बेस्ट तर्फे शेलार यांनी काम पाहीलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading