ठाणे रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी ८०० कोटी रुपयांची निविदा

ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाचा विकास करण्यासाठी भाजपाकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे मंत्रालयाने ठाणे रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासासाठी ८०० कोटी रुपयांची निविदा जारी केली आहे. येत्या ३१ मार्च रोजी निविदा खुली होत आहे. या महत्वपूर्ण व ऐतिहासिक निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपाचे आमदार व ठाणे शहराध्यक्ष निरंजन डावखरे व आमदार संजय केळकर यांनी आभार मानले आहेत.

ठाणे रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी ठाणे शहर भाजपच्या वतीने रेल्वेमंत्री अश्विनीजी वैष्णव यांची गेल्या वर्षी ८ डिसेंबर २०२१ रोजी भेट घेतली होती. राज्यसभेचे तत्कालीन सदस्य विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखाली या शिष्टमंडळात आमदार निरंजन डावखरे, महापालिकेतील तत्कालीन गटनेते मनोहर डुंबरे, सुजय पत्की यांचीही उपस्थिती होती.
मुंबई-ठाणे दरम्यान १६ एप्रिल १८५३ मध्ये पहिल्यांदा रेल्वे गाडी धावली होती त्यामुळे ठाणे स्थानकालाही ऐतिहासिक दर्जा आहे या रेल्वे स्टेशनच्या विमानतळाच्या धर्तीवर विकासामुळे प्रवाशांचा प्रवास सुकर होईल.

ठाणे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी ३१ मार्च २०२३ पर्यंत निविदा प्रक्रिया खुली होत असून ३१ मेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाईल. त्यानंतर लगेचच कामाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे काही महिन्यातच ठाणेकरांना अद्ययावत स्थानक उपलब्ध होईल.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading