डॉक्टर आणि पोलिसांनी समनवयानी काम करणं गरजेच- सह पोलिस आयुक्त

पोलिस आणि डॉक्टर या दोन्ही क्षेत्रांमध्ये ताण तणाव आणि कामाच्या वेळा अनिश्चीत असतात. तरी देखिल डॉक्टर आणि पोलिस स्विकारलेल्या कामास अव्याहतपणे न्याय देत असतात. असे विचार ठाण्याचे अप्पर पोलिस आयुक्त पंजाबराव उगले यांनी व्यक्त केले. ठाणे शहर पोलिस आयोजीत वैदयकीय क्षेत्रातिल मान्यवरांशी परिसंवादात ते बोलत होते. करोना काळात डॉक्टर आणि पोलिसांनी केलेल्या अथक परिश्रमाचा दाखला देत पोलिस आणि डॉक्टरांच्यात समनवय आणि सहकार्य वाढवण्याची आपेक्षा व्यक्त केली. यावेळी डॉक्टरांनी त्यांना येणा-या अडचणी मांडल्या. डॉ. महेश जोशी यांनी पोक्सो कायदया बाबत येणाऱ्या अडचणी मांडल्या. डॉक्टर आणि पोलिस ही समाजाची महत्त्वाची अंग असुन त्यांच्यात समनवय असल्यास लोकांना चांगली सेवा देण्यास मदत होऊ शकेल असं सह पोलिस आयुक्तांनी सांगितलं. या कार्यक्रमास अनेक मान्यवर आणि डॉक्टर तसेच पोलिस उपस्थित होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading