समतोल फौडेशनमार्फत दिव्यांग निवाऱ्यात अन्नछत्र

केंद्र सरकारने दिव्यांगांसाठी विविध योजना तसेच सवलती लागु केल्या असुन पंतप्रधान नरेंद्र मोदी दिव्यांगाप्रती नेहमीच आपुलकी व्यक्त करतात. त्यांच्याच प्रेरणेतुन ठाण्यातही दिव्यांगांना चार घास सुखाचे खाता यावेत यासाठी खासदार निधीतुन दिव्यांग निवारा उभारला असल्याचे प्रतिपादन राज्यसभेचे खासदार विनय सहस्त्रबुद्धे यांनी केले. कोपरीत सहस्त्रबुद्धे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलेल्या दिव्यांग निवाऱ्यात समतोल फौडेशनमार्फत मोफत अन्नछत्र सुरु करण्यात आले. यावेळी आ.केळकर यांनी, समाजातील शेवटच्या स्तरातील घटकापर्यत मदत व्हावी, या हेतुनेच दिव्यांग निवारा आणि त्यांच्यासाठी मोफत अन्नछत्र सुरु केले आहे.तसेच, आठवड्यातील रविवार वगळता दररोज याठिकाणी दिव्यांग बांधवांना मोफत भोजन दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment

%d bloggers like this: