सनातन संस्थेच्या वतीने दत्त जयंतीच्या निमित्ताने ग्रंथप्रदर्शनांच्या माध्यमातून अध्यात्मप्रसार

सनातन संस्थेच्या वतीने दत्त जयंतीच्या निमित्ताने ठाणे जिल्ह्यात एकूण 28 ठिकाणी विविध दत्त मंदिरांजवळ ग्रंथप्रदर्शने लावून अध्यात्मप्रसार करण्यात आला. या ग्रंथ कक्षांच्या माध्यमांतून अध्यात्म आणि साधनेविषयी अलौकिक ज्ञान असलेले सनातनचे ग्रंथ भाविक आणि जिज्ञासू यांच्यासाठी उपलब्ध करण्यात आले. या सर्व ग्रंथ प्रदर्शनांना भेट देणारे भाविक आणि जिज्ञासूंचा उत्तम प्रतिसाद लाभला. जिल्ह्यात ठाणे शहर, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, कल्याण आणि मुरबाड आदी भागात येथे सनातन संस्थेच्या वतीने ही ग्रंथप्रदर्शने लावण्यात आली. दत्तगुरूंच्या उपासनेविषयीच्या ग्रंथांसह सनातन संस्थेच्या वतीने प्रकाशित करण्यात आलेली अध्यात्म, साधना, देवतांची उपासना, आचारधर्म, धर्माचरण, बालसंस्कार, राष्ट्ररक्षण, धर्मजागृती, ईश्‍वरप्राप्तीसाठी कला, आपत्काळात जीवित रहाण्यासाठी उपाय, आयुर्वेद, आरोग्य आदी विषयांवरील ग्रंथमालिकेतील ग्रंथ तसेच सात्त्विक उत्पादनांचे येथे वितरण करण्यात आले. दत्तजयंतीच्या पार्श्‍वभूमीवर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासूनच दत्त उपासनेचे शास्त्र जिज्ञासूंना कळावे यासाठी ऑनलाईन व्याख्याने, सामूहिक नामजप, फलक प्रसिध्दी, सोशल मिडीया आदी माध्यमातूनही लोकांचे प्रबोधन करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading