वर्तकनगरकडे जाणा-या रस्त्यावर ऑईल पडल्याने काही वेळ वाहतूक मंदावली

पोखरण रोड नंबर ०१, सिंघानिया शाळेजवळ वर्तकनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर आज दुपारच्या सुमारास ऑईल पडले होते. आपत्ती  व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या माहितीनुसार घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०१-पिकअप वाहनासह उपस्थित होते. सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.

आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि स्थानिक लोकांच्या मदतीने रस्त्यावरती पडलेल्या ऑईलवरती माती टाकण्यात आली असून, रोड सर्व वाहनांच्या वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे.

यामुळे काही वेळ वाहतूक मंदावली होती

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading