आमदार प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या लोकमान्यनगर येथील महिला बचत गटाचे लोकार्पण

आमदार प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या लोकमान्यनगर येथील महिला बचत गटाचे लोकार्पण करण्यात आले. समाज विकास विभागाच्या सहाय्यक आयुक्त वर्षा दिक्षित तसेच समाज विकास विभागाचे मनिष वाघमारे यांच्या उपस्थितीत स्थानिक महिला बचत गटांना लोकार्पण करण्यात आले. या बचत गटामध्ये महापालिकेच्या माध्यमातून महिलांना व्यवसायाबद्दल मार्गदर्शन होणार असून लोकमान्यनगर, शास्त्रीनगर आणि वर्तकनगर या परिसरातील सर्वसामान्य महिला सक्षम कशी होईल? यासाठी या बचत गटाच्या इमारतीचा वापर केला जाणार आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून टिकाऊ खाद्यपदार्थ बनविले जाणार असून ते विक्रीकरिता बाजारपेठही उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी लागणारे भागभांडवल शासनाच्या योजनेअंतर्गत उपलब्ध करून देणार असून उर्वरीत रक्कम आपण देऊ असं आश्वासन सरनाईक यांनी यावेळी दिलं.
लोकमान्यनगर, शास्त्रीनगर आणि आसपासच्या परिसरातील सुमारे ३०० महिलांना या बचत गटाच्या माध्यमातून रोजगार देण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवणार असल्याचे वर्षा दिक्षित यांनी सांगितले.
महिला बचत गट भवनाच्या शेजारीच असलेल्या रामचंद्र ठाकुर तरण तलाव परिसरात प्रताप सरनाईक यांच्या आमदार निधीतून ५० लाख रूपये खर्च करून स्केटींग ट्रॅकचा भुमिपुजन समारंभही यावेळी झाला. ख्रिसमस आणि नविन वर्षाच्या सुट्टीनिमित्त १६ डिसेंबर पासून लोकमान्यनगर, वर्तकनगर, शास्त्रीनगर परिसरातील लहान मुलांसाठी स्व. रामचंद्र ठाकुर तरण तलावामध्ये पोहण्याच्या स्पर्धेचे आयोजन युवा सेनेच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती युवा सेना सचिव पुर्वेश सरनाईक यांनी दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading