ठाण्यामध्ये गोळीबाराचं सत्र सुरू असून कशेळी येथे झालेल्या गोळीबारात गणेश कोकाटेचा मृत्यू

ठाण्यामध्ये गोळीबाराचं सत्र सुरू असून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या गणेश कोकाटेवर कशेळी येथे झालेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला आहे. कशेळी भागात आज पुन्हा गोळीबाराची घटना घडल्यानं खळबळ उडाली आहे. गण्या कोकाटे या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीवर अज्ञात व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला. कोकाटे आपल्या चारचाकी वाहनातून जात असताना हा गोळीबार झाला. त्यानंतर जखमी गणेश कोकाटेला ज्युपिटर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं जातं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading