ठाण्यामध्ये आज सर्वत्र धुक्याची दुलई पांघरल्याचं चित्र

ठाण्यामध्ये आज सर्वत्र धुक्याची दुलई पांघरल्याचं चित्र दिसत होतं. गेले काही दिवस वातावरणाचा पारा घसरला होता. मात्र गेल्या दोन दिवसापासून पुन्हा तापमानाचा पारा चढल्यामुळे हवेतील गारवा कमी झाला होता. मात्र आज सकाळी ७ नंतर सर्वत्र दाट धुकं दिसत होतं. हे धुकं इतकं दाट होतं की समोरच असलेले डोंगर, रस्ते, इमारतीही दिसत नव्हत्या. जवळपास सकाळी साडेनऊ पर्यंत अशी परिस्थिती दिसत होती. या धुक्यामुळे हवेतील थंडी गायब झाल्यामुळे वातावरणात काहीशी वाढ झाल्याचं दिसत होतं. वा-याचा वेग थंडावल्यामुळे हे धुकं पडल्याचं सांगण्यात आलं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading