निधी दावडाचे झंझावती नाबाद अर्धशतक

निधी दावडाच्या झंझावती नाबाद अर्धशतकाच्या जोरावर सलग तिसरा सामना जिंकत स्पोर्टिंग क्लब कमिटी संघाने स्पोर्टिंग युनियन क्लबचा पाच विकेट्सनी पराभव करत अर्जुन मढवी स्मृतीचषक महिला टी ट्वेन्टी लीग क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवले. डॉ राजेश मढवी स्पोर्टस असोसिएशन आणि दैवज्ञ क्रिकेट क्लब आयोजित स्पर्धेतील सामन्यात स्पोर्टिंग युनियन क्लबने दिलेले २० षटकात ६ बाद १२० धावांचे आव्हान निधीच्या शानदार खेळीमुळे स्पोर्टिंग क्लब कमिटी संघाने २० व्या षटकात ५ बाद १२१ धावा करत पार केले.
प्रथम फलंदाजी करताना स्पोर्टिंग युनियन क्लबने २० षटकात ६ बाद १२० अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली. संघाच्या धावसंख्येत जुईली भेकरे (३०) आणि प्रतीक्षा पवारने २९ धावांचे योगदान दिले. अनिशा शेट्टी आणि वैष्णवी पालवने प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. रोमा तांडेल आणि निव्या आंब्रेने प्रत्येकी एक विकेट मिळवली.
उपांत्य फेरीत खेळण्यासाठी आवश्यक असणारा विजय मिळवताना निधीने ३२ चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकार ठोकत नाबाद ५६ धावांची अर्धशतकी खेळी केली. निव्या आंब्रेने ३४ धावा करत आपली जबाबदारी चोख पार पाडली. जुईली भेकरेने दोन आणि सिद्धी पवार, मानसी पाटील, लकिशा लब्ध्येने प्रत्येकी एक फलंदाज बाद केला.केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते निधीला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
संक्षिप्त धावफलक –
स्पोर्टिंग युनियन क्लब : २० षटकात ६ बाद १२० ( जुईली भेकरे ३०, प्रतीक्षा पवार २९, आनिशा शेट्टी ३-२१-२, वैष्णवी पालव ४-१-१५-२, रोमा तांडेल ४-३०-१, निव्या आंब्रे ४-२४-१) पराभुत विरुद्ध स्पोर्टिंग क्लब कमिटी : निधी दावडा नाबाद ५६, निव्या आंब्रे ३४, जुईली भेकरे ४-१-१२-२, सिद्धी पवार ३.४- २२-१, मानसी पाटील ४-१६-१, लकीशा लब्धे ४-२३-१). सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू – निधी दावडा.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading