ठाणे रेल्वे पोलीस कर्मचा-यांमार्फत ठाणे पूर्व रेल्वे स्थानकात मॉकड्रिल

ठाणे रेल्वे पोलीस कर्मचा-यांमार्फत आज सकाळी मॉकड्रिल आयोजित करण्यात आलं होतं. आज सकाळी ११:३५ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार प्लॅटफॉर्म क्रमांक-१०/A येथील रेल्वे ब्रीजखाली एक अज्ञात संशयित बॅग आढळली होती. या घटनेची माहिती मिळताच ठाणे रेल्वे पोलीस कर्मचारी, रेल्वे संरक्षण दलाचे कर्मचारी, श्वान पथक, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी-कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे जवानांनी घटनास्थळी जाऊन तपासणी केली. त्यानंतर हे मॉकड्रिल यशस्वीपणे पूर्ण झाले.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading