संगीतभूषण पं. राम मराठे महोत्सव हा रसिकांसाठी पर्वणी – बेगम परवीन सुलताना

संगीत साधनेत यशस्वी होऊन वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी पद्मभूषणपुरस्काराने सन्मानित होणाऱ्या ख्यातकीर्त गायिका बेगम परविन सुलताना यांच्या दमदार गायकीने यावर्षीच्या राम मराठे संगीत महोत्सवाची सुरुवात गडकरी रंगायतन येथे झाली. आम्ही कलाकार पुजारी आहोत , रसिक प्रेक्षक आमचे देव असून रसिकांच्या मंदिरात येवून आम्ही कलेची पूजा करीत असतो. ठाणे महापालिकेने संगीतभूषण पं. राम मराठे महोत्सव आयोजित करुन कलावंतांना कला सादर करण्याची संधी दिली त्याबद्दल ठाणे महापालिकेचे त्यांनी आभार व्यक्त करीत हा महोत्सव म्हणजे ठाणेकरांसाठी पर्वणी असल्याचेही त्यांनी सांगितले. ठाणे महापालिकेच्या वतीने आयोजित संगीत भूषण पं राम मराठे महोत्सवाचा शुभारंभ गडकरी रंगायतन येथे झाला. गेली 45 वर्षे कथ्‌थ्क या नृत्यप्रकाराची अतुलनीय साधना करुन आजवर कथ्थक नृत्याच्या अनेक शिष्या घडविणाऱ्या डॉ. मंजिरी देव यांना रोख रुपये 51,000/- सन्मानचिन्ह देवून संगीतभूषण पं. राम मराठे राज्यस्तरीय पुरस्काराने तर गेली 20 वर्षे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेणाऱ्या व 10 वर्षे अध्यापनाचे काम करीत संगीताची साधना करणाऱ्या दीपिका भिडे- भागवत यांना रोख रुपये 25,000/- सन्मानचिन्ह देवून पं. राम मराठे युवा पुरस्कार पद्मभूषण परवीन बेगम सुलताना यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. गडकरी रंगायतन ही वास्तू जेव्हा निर्माण झाली त्यावेळी मी या ठिकाणी नृत्य सादर केले आहे. ज्या रंगमंचावर नृत्य सादर केले, त्याच रंगमंचावर ठाणे महानगरपालिकेने संगीतभूषण पं. राम मराठे यांच्या नावाने दिलेला पुरस्कार स्वीकारताना मला विशेष आनंद होत आहे. रंगदेवता प्रसन्न असलेली गडकरी रंगायतन ही वास्तू असल्याचेही डॉ. मंजिरी देव यांनी सत्काराला उत्तर देताना नमूद केले. गेली २६ वर्षे संगीत भूषण पंडित राम मराठे संगीत महोत्सव आयोजित करण्यात येत असून ठाणे महापालिकेच्या वतीने हा स्त्युत्य उपक्रम राबवला जातो. आज पद्मश्री बेगम परवीन सुलताना यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची मला संधी मिळाली त्यामुळे मी स्वत:ला भाग्यवान समजतो. ठाण्याची सांस्कृतिक कार्यक्रमाची परंपरा फार मोठी असून ही अधोरेखीत करणारी बाब आहे असे सांगत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी तीन दिवस सुरू असणाऱ्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. महोत्सवाचा शुभारंभ सायली तळवलकर यांनी इंडिरुट्स या कार्यक्रमाने केला. त्यात शास्त्रीय संगीत आणि आधुनिक संगीत चे फ्युजन सादरीकरण केले त्यात शिवतांडव, राग माला पेश केली त्यात (अहीरभैरव , बागेश्री , बिहाग राग ) , अलबेला सजन आयो रे , रंगी सारी बुलविया रे सादर केले .सायली तळवलकर (गायन), अभिषेक भुरूक (ड्रम्स), कल्याण पांडे (तबला), रोहित कुलकर्णी (की बोर्ड), संकेत नाशिक (गिटार) हे कलाकार साथ केली. तर महोत्सवाच्या उत्तरार्धात बेगम परवीन सुलताना यांनी राग मालकंस सादर केला. त्यांना तबल्यावर पंडित मुकुंदराज देव, पेटीवर श्रीनिवास आचार्य, विद्या जाईल, शादाब सुलताना खान, श्रेया यांनी तानपुरा साथ केली.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading