राज्यात प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य पदार्थ गुटख्याची वाहतूक करणा-या दोघांना अटक – ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त

राज्यात प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य पदार्थ गुटख्याची वाहतूक करणा-या दोघांना भिवंडीच्या गुन्हे शाखेनं पकडलं असून ७७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. काल भिवंडी गुन्हे शाखेला राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरिक्षक सचिन गायकवाड, अन्न सुरक्षा अधिकारी आणि औषध प्रशासन यांच्या संयुक्त पथकानं भिवंडीतील नदी नाका पूलाजवळ एक ट्रक अडवला आणि त्याची तपासणी केली असता या ट्रकमध्ये राज्यात प्रतिबंधित असलेला तंबाखूजन्य पदार्थ प्रिमियम राज निवास सुगंधित पान मसाला मिळून आला. पोलीसांनी याप्रकरणी ट्रक चालक मूर्ताज अन्सारी, कुर्बान अन्सारी अशा झारखंड राज्यातील दोघांना पकडलं आहे. त्याचप्रमाणे वाहनाचे मालक भारत ट्रान्सपोर्ट, परमिट होल्‍डर जुमेर अहमद यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती भिवंडी पोलीसांतर्फे देण्यात आली.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading