ठाणे शहर पोलिस दलातील महिला पोलीस नाईक देवकी राजपूत यांचा पोलीस महासंचालक पदकाने गौरव

ठाणे शहर पोलिस दलातील महिला पोलीस नाईक देवकी राजपूत यांचा पोलीस महासंचालक पदकाने गौरव करण्यात आला.ठाणे शहरातील उत्तम खेळाडू म्हणून देवकी राजपूत यांचा तसंच इतर २५ पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचा पोलीस महासंचालक पदकाने गौरव करण्यात आला. देवकी यांना आत्तापर्यंत एकुण सात वेळा महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांमध्ये जुदो आणि कुस्ती या खेळामध्ये सलग सुवर्णपदक मिळाले आहे. तसेच 2019 मध्ये महाराष्ट्र पोलीस गेम्स मध्ये त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलामधील जुदो आणि कुस्ती या दोन्ही खेळांमध्ये बेस्ट प्लेयर म्हणून किताब पटकावला आहे. तसेच अखिल भारतीय पोलीस कुस्ती स्पर्धेमध्ये (राष्ट्रीय स्पर्धा मध्ये) रौप्यपदक आणि कांस्यपदक मिळवले असून त्या जुदोच्या ब्लॅकबेल्ट धारक आहेत. देवकी ही महाराष्ट्रातील एकमेव कुस्ती पटू आहे. तसेच ती पहिली महिला महाराष्ट्र तेलगंना केसरी चा मान मिळवला. ठाणे महापालिकेनेही बेस्ट खेळाडु म्हणुन देवकीला गौरवले आहे. सध्या देवकी ही महाराष्ट्र पोलीस डिपार्टमेंट मध्ये घाटकोपर येथे कुस्ती खेळाचे प्रशिक्षण देत असून तिने नोव्हेंबर मध्ये झालेल्या ऑल इंडिया पोलीस गेम्स पुणे येथे महाराष्ट्राला सात पदके मिळवून दिली. त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांना पोलीस महासंचालक पदक मिळाल्याने त्यांचे सर्व स्तरावर कौतुक होत आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading