माजिवडा येथे नाल्यामध्ये पडलेल्या गर्भ गायीची महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी केली सुखरूप सुटका

माजिवडा येथे आज दुपारी नाल्यामध्ये पडलेल्या गर्भ गायीची महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप सुटका केली. आज दुपारी अडीचच्या सुमारास माजिवड्यामधील जयभवानी नगर येथे गणपती कारखान्याच्या बाजूला असलेल्या नाल्यात तानाजी शिंदे यांची एक गर्भ गाय पडली होती. ही माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळताच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक आणि घनकचरा विभागाचे कर्मचारी, आर्यन कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान आणि पशुवैद्यकीय दवाखान्याचे डॉक्टरांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्य सुरू केलं आणि या गाईची ३ तासांच्या प्रयत्नानंतर हायड्रा मशीनच्या मदतीने सुखरुप सुटका करण्यात आली. यामध्ये कोणतीही दुखापत झाली नसून या गाईवरती पशुवैद्यकीय विभागाच्या डॉक्टरांच्या मार्फत उपचार करण्यात आले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading