जनकवी पी. सावळाराम कला समितीचे प्रमुख विश्वस्त  संजय पी. सावळाराम यांचे अल्पशा आजाराने निधन

जनकवी पी. सावळाराम कला समितीचे प्रमुख विश्वस्त  संजय पी. सावळाराम यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. जनकवी आणि ठाणे महापालिकेचे दिवंगत नगराध्यक्ष पी. सावळाराम यांचे ते ज्येष्ठ पुत्र होते. त्यांच्या पश्चात भगिनी डॉ. कल्पना पाठारे, पत्नी गीता, मुलगा ओंकार पाटील, मुलगी संपदा पाटील, सुन आणि नात असा परिवार आहे. पाटील हे खासगी कंपनीतून सेवानिवृत्त झाले होते. ते जनकवी पी. सावळाराम कला समितीचे विश्वस्त म्हणून काम पाहत होते. पी सावळाराम पुरस्कार सोहळ्याच्या तयारीत व्यस्त असतांनाच अल्पशा आजाराने त्यांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading