श्री माँ बालनिकेतन हायस्कूलच्या वतीने ३ – ४ डिसेंबरला आंतरशालेय स्पर्धा

ठाणे पूर्व कोपरी गाव येथील श्री माँ बालनिकेतन हायस्कूल द्वारा २८ वी आंतरशालेय स्पर्धा शनिवार ३ डिसेंबर व रविवार ४ डिसेंबर 2022 रोजी ठाणे शहर व परिसरातील शाळांसाठी दरवर्षाप्रमाणे आयोजित करण्यात आली आहे.विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्त्वाला आकार देणाऱ्या आणि भरघोस बक्षिसे असलेल्या बुद्धिगम्य व मनोरंजक अशा या स्पर्धेत हस्तलेखन, फॅब्रिक पेंटींग, काव्यवाचन, कथाकथन, इंग्लिश-हिंदी-मराठी वक्तृत्व, सायन्स क्वीझ, संस्कृत पठण, रेखाचित्र, निंबंध स्पर्धा (हिंदी, मराठी, इंग्रजी), कथालेखन, पॉटपेंटींग, गायन, फॅन्सी ड्रेस, मेहंदी, संगणक सादरीकरण, रांगोळी, टाकाऊपासून टिकाऊ या विविध विषयांच्या स्पर्धांचे आयोजन केले आहे. पहिली ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकांना पारितोषिके तसेच चषकही देण्यात येणार आहेत.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading