माझी वसुंधरा अभियानातंर्गत पंचमहाभूतावर आधारित केलेल्या कामाचे होणार मूल्यमापन

माझी वसुंधरा अभियानातंर्गत पर्यांवरणाचे संरक्षण आणि संवर्धन करणाऱ्या विविध योजना महापालिकांनी प्रभावीपणे राबविल्यामुळे शासनाच्या पर्यावरण विभागाच्या वतीने माझी वसुंधरा अभियान 3 ची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या अभियानातंर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांनी पृथ्वी, वायु, जल, अग्नी आणि आकाश या निसर्गाशी संबंधित पंचमहाभूताच्या घटकांवर केलेल्या कामांचे मूल्यमापन करण्यात येणार असून या अभियानात नागरिकांना सहभागी करुन घेण्याच्या सूचना अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी दिल्या. मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान यांनी माझी वसुंधरा अभियान 3 टूलकिटचे सादरीकरण केले असून हे टूलकिट सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्गमित केले आहे. या बाबतची माहिती देण्यासाठी एक कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. पर्यावरणाचे जतन, संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी माझी वसुंधरा हा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमातून वातावरणीय बदल आणि पर्यावरणाच्या समस्याबद्दल नागरिकांना जागरुक करुन त्यांना पर्यावरणाच्या सुधारणेप्रती प्रयत्न करण्यात येतात. पंचतत्वावर केलेल्या कामाचे मूल्यमापन करण्यासाठी अमृत गटाकरता 7600 आणि अमृत गट वगळून इतर गटांसाठी 7500 गुण ठेवण्यात आले आहेत. 2020-21 मध्ये अमृतसिटी शहरांमध्ये ठाणे शहर हे पहिल्या क्रमांकावर होते तर 2021-22 मध्ये ठाणे शहर पाचव्या क्रमाकांवर होते. ठाणे शहराला पहिल्या क्रमाकांवर आणण्यासाठी पंचमहाभूतांवर आधारित घटकांवर लक्ष केंद्रीत करण्याच्या सूचना संजय हेरवाडे यांनी दिल्या. या अभियानात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात ओला –सुका कचरा वर्गीकरण, सार्वजनिक वाहतूक, सायकलचा वापर, हवेतील प्रदुषण टाळणे, वृक्षलागवड आणि वृक्षसंवर्धन करणे आदी बाबींचे मूल्यमापन होणार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading