ठाण्यातील शाळांमध्ये संविधानाविषयी मार्गदर्शन

विद्या प्रसारक मंडळाच्या टिएमसी विधी महाविद्यालय, ठाणे आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे यांच्या संयुक्त विद्यामाने संविधान दिवसाच्या निमित्त २५ नोव्हेबर रोजी ठाणे शहरातील चार शाळेमध्ये एकाच वेळी संविधानात दिलेली उद्देशिका, मुलभुत हक्क, मुलभुत कर्तव्ये यावर मार्गदर्शन करण्यात आले. महाविद्यालयाच्या एकुण १६ विद्यार्थ्यानी यात सहभाग नोंदविला. ठाणे महानगरपालिका शाळा, वर्तकनगर, भारत इंग्रजी हायस्कुल ठाणे, ए के जोशी हायस्कुल, नौपाडा ठाणे आणि मंगला हायस्कुल ठाणे. यावेळी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यानी विधी महाविद्याद्वारे दिल्या जाणा-या मोफत विधी सल्ल्याबद्दल व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाद्वारे दिल्या जाणा-या विधी सेवेची ही माहीती दिली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading