बाबा रामदेव यांच्या वादग्रस्त विधानाने खळबळ

महिलांनी साडी, सलवार सूट परिधान केल्यावर त्या सुंदर दिसतात तसेच माझ्यासारखे कपडे परिधान केले नाही तरी त्या सुंदर दिसतात असे वादग्रस्त वक्तव्य योगगुरू बाबा रामदेव यांनी ठाण्यात बोलताना केले. ढोकाळी येथील हायलँड मैदानात महिलांसाठी योग शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी बाबा रामदेव यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केलं. या शिबीरास उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीसही उपस्थित होत्या. यावेळी त्यांनी अमृता फडवणीस १०० व्या वर्षीही म्हाता-या दिसणार नाहीत, त्यांच्याकडे तरूण राहण्याची प्रबळ इच्छाशक्ती आहे, त्या नेहमीच तोलून मापून खातात अशा शब्दात त्यांचे कौतुक केले. खासदार श्रीकांत शिंदे यांनी या नि:शुल्क योग शिबीराचं आयोजन केलं होतं.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading