कोपरी ठाणेकरवाडी येथील स्मशानभूमीचा लवकरच होणार कायापालट

कोपरी ठाणेकरवाडी येथील स्मशानभूमीचा लवकरच कायापालट होणार आहे. भाजपाचे नगरसेवक भरत चव्हाणांच्या पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्मशानभूमीच्या नुतनीकरणासाठी विशेष निधी मंजूर केला. या निधीच्या माध्यमातून स्मशानभूमीचे आधुनिकीकरण करण्याच्या कामाला सुरुवात झाली. या निर्णयाने वर्षानुवर्षे जुन्या स्मशानभूमीचा कायापालट होणार आहे. कोपरी धर्मादाय ट्रस्टच्या माध्यमातून अनेक वर्षांपासून स्मशानभूमी सुरू आहे. कोपरी परिसराची लोकसंख्या वाढल्यानंतर स्मशानभूमीचे नुतनीकरण करण्याची मागणी केली जात होती. त्याचबरोबर आधुनिक सुविधा उपलब्ध करण्याची नागरिकांकडून विनंती केली जात होती. या प्रश्नावर काही नागरिकांनी भरत चव्हाण आणि ओमकार चव्हाण यांचीही भेट घेतली होती. त्यानंतर चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करून ठाणेकरवाडी स्मशानभूमीच्या दुरुस्तीसाठी विशेष निधी मंजूर केला. या निधीतून कामाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले.

Leave a Comment

%d bloggers like this: