ठाणे स्मार्टसिटी कार्यक्रमातंर्गत नागरिकांच्या सहभागासाठी पथनाट्य, होर्डिंग्जद्वारे शहरात जनजागृती

शहर नियोजनाचे धोरण ठरविताना त्यात नागरिकांचा सहभाग कसा वाढविता येईल, यासाठी एक मार्गदर्शक प्रणाली तयार करण्याचे काम केंद्र सरकार स्मार्टसिटी योजनेतंर्गत करीत आहे. देशातील 100 स्मार्टसिटी शहरांमध्ये ‘अर्बन आउटकम फ्रेमवर्क 2022′ या कार्यक्रमातंर्गत’नागरिक आकलन सर्वेक्षण’ उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

नागरिकांना या अर्बन आऊटकम फ्रेमवर्क कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी करुन घेण्यात यावे, तसेच या उपक्रमाची माहिती नागरिकांपर्यंत पोहचावी यासाठी प्रभाग समितीनिहाय सार्वजनिक ठिकाणी पथनाट्याच्या माध्यमातून शहरातील विविध ठिकाणी जनजागृती करण्यात येत आहे.
9 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत ही जनजागृती मोहिम सुरू राहणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांचा यात सहभाग असावा यासाठी वर्दळीच्या ठिकाणी पथनाट्य सादरीकरण केले जात आहे. ठाणे महापालिका मुख्यालयाच्या आवारात जनजागृतीपर पथनाट्य सादरीकरण करण्यात आले. ठाणे स्मार्ट सिटी अंतर्गत नागरिकांसाठी राबविलेल्या प्रकल्पांची माहिती या पथनाट्याच्या माध्यमातून दिली जात आहे. स्वच्छ ठाणे, सुंदर ठाणे, हरित ठाणे, तलावांचे ठाणे आणि स्मार्ट ठाणे अशी ठाण्याची ओळख नागरिकांना या पथनाट्याच्या माध्यमातून होत आहे. २२ नोव्हेंबरपासून शहरातील विविध ठिकाणी पथनाट्य सादरीकरण सुरू आहे. उथळसर प्रभागसमितीअंतर्गत राबोडी सरस्वती शाळा परिसर, आयडियल शाळा, रुस्तमजी शाळा, हॉलीक्रॉस शाळा , सरस्वती स्कूल, टेकडी बंगला, श्रीरंग विद्यालय लोकमान्य सावरकर प्रभागसमिती अंतर्गत अ.ग. जोशी हॉस्प‍िटल, अयप्पा मंदिराजवळ, वर्तकनगर, इंदिरानगर, माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत सरस्वती चौक, आनंदनगर, गायमुख चौपाटी, मुंब्रा प्रभागसमितीअंतर्गत मुंब्रा अग्निशमन केंद्र, मुंब्रा स्टेशन परिसर आदी ठिकाणी नागरिकांमध्ये पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. तसेच ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात विविध ठिकाणी होर्डिंग्जच्या माध्यमातून ‘आपले शहर शैक्षणिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या अग्रेसर आहे, आपले शहर आपली संस्कृती जपत आहे, आपले शहर प्रगती करत आहे, आपले शहर प्रदुषणमुक्तीकडे वाटचाल करीत आहे , तलावांचे शहर म्हणून ओळखले जात आहे ‘ अशी जनजागृती करण्यात येत आहे. नागरिकांनी ठाणे स्मार्ट सिटीच्या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन महापालिकेनं केलं आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: