कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या प्रारुप मतदार यादीत 16 हजार 82 स्त्री आणि 14 हजार 80 पुरुष मतदार

कोकण विभाग शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्या तयार करण्याबाबतच्या कार्यक्रमांतर्गत प्रसिध्द करण्यात आलेल्या प्रारुप याद्यांमध्ये 30 हजार 162 मतदार असून त्यापैकी 16 हजार 82 स्त्रिया आणि 14 हजार 80 पुरुष मतदार असल्याची माहिती कोकण विभागाचे उपआयुक्त मनोज रानडे यांनी दिली. भारत निवडणूक अयोगाकडून कोकण विभाग शिक्षक मतदार संघासाठी नव्याने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम 1 ऑक्टोबर ते 30 डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. 23 नोव्हेंबर ते 9 डिसेंबर या कालावधीत प्रसिध्द झालेल्या मतदार याद्यांवरील दावे – हरकती स्वीकारण्यात येतील. मतदार याद्यांवरील दावे आणि हरकती कोकण विभागीय आयुक्त तथा मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय, कोकण भवन, सीबीडी बेलापूर तसेच जिल्हाधिकारी तथा सहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी, जिल्ह्यातील इतर पदनिर्देशित अधिकारी यांची कार्यालये या ठिकाणी स्वीकारण्यात येणार आहेत. मतदारांनी संबंधित कार्यालयांमध्ये जाऊन आपले दावे आणि हरकती नोंदवाव्या असे आवाहन मनोज रानडे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

 

Leave a Comment

%d bloggers like this: