ठाण्याच्या माजी महापौर शारदा राऊत यांचे आज दिर्घ आजाराने निधन

ठाण्याच्या माजी महापौर शारदा राऊत यांचे आज दिर्घ आजाराने निधन झाले. त्याच्या पश्यात दोन मुले,सूना,नातवंडे असा परिवार आहे. गेल्या अनेक वर्षांपासून किडणीच्या आजाराने त्या त्रस्त होत्या. गेले काही दिवस त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. अखेर आज ठाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याची प्राणज्योत मालवली. २००२ ते २००५ या कालावधीत त्यांनी ठाण्याचे महापौर पद भूषविले होते. त्यावेळी त्यांनी अनेक कठोर निर्णय घेतले होते. मेंटल रुग्णालय आणि परब वाडी मधून त्या प्रतिनिधित्व करत होत्या.

Leave a Comment

%d bloggers like this: