सी.डी. देशमुख प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये घवघवीत यश

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) “महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब २०२१ या स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहिर झाला असून, या स्पर्धेत  ठाणे महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या स्पर्धा परीक्षेत “राज्य कर निरीक्षक (STI) ” या पदासाठी धनंजय बांगर State Rank – ११०, ऋतुजा पवार – State Rank- २०२ व ८th Rank in Female या विद्यार्थ्यांची अंतिम निवड झाली आहे. तसेच, ऐश्वर्या सुर्वे यांची “राज्य कर निरीक्षक (STI) ” या पदासाठी State Rank- ३४७ आणि “सहाय्यक कक्ष अधिकारी (ASO) – State Rank ६७ या पदासाठी अंतिम निवड झाली आहे.  महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) राज्य सेवा मुख्य परीक्षा – २०२२ या स्पर्धा परीक्षेत संस्थेतील मेघा कुटे, शमा अनुसे, ऐश्वर्या सुर्वे, चेतन वाडिले, आशिष खेनात हे विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असून, सदरचे विद्यार्थी हे अंतिम मुलाखतीस पात्र झालेले आहेत. तसेच, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) राज्यसेवा पूर्व परीक्षा -२०२२ या स्पर्धा परीक्षेत संस्थेतील एकुण १७ विद्यार्थी/ प्रशिक्षणार्थी उत्तीर्ण झालेले असून, सदरचे विद्यार्थी हे मुख्य परीक्षेकरीता पात्र झालेले आहेत.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) “महाराष्ट्र दुय्यम सेवा अ- राजपत्रित गट- ब २०२१” या स्पर्धा परीक्षेत अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या जिद्दीने, मेहनतीने, चिकाटीने आणि चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेने केलेल्या योग्य मार्गदर्शनाच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: