कल्याणमध्ये भर वस्तीत बिबट्याच्या दर्शनाने गोंधळ – तीन जखमी

कल्याण पूर्वेत म्हणजे भर वस्तीत बिबट्यानं धुमाकूळ घातला असून बिबळ्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी झाले आहेत. कल्याण पूर्वतील चिंचपाडा रस्ता हा तसा भर मनुष्य वस्तीतील भाग आहे. या मनुष्य वस्तीतील श्रीराम अनुग्रह टॉवर येथे सकाळच्या सुमारास बिबळ्या शिरला होता. बिबळ्याला पाहण्याच्या गोंधळात ३ जण जखमी झाले आहेत. बिबळ्या आल्याच्या वृत्तानं बघ्यांची एकच गर्दी जमली होती. त्यामुळं या गोंधळात आणखी भर पडली. त्यानंतर वन विभागाला पाचारण करण्यात आलं. वन विभागानं या बिबळ्याला एका ठिकाणी जखडून ठेवलं असून इमारतीतील सर्व रहिवाशांना दारे-खिडक्या बंद करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. बिबळ्या पकडणारं पथक दाखल होताच बिबळ्याला जेरबंद केलं जाईल असं वन विभागातर्फे सांगण्यात आलं. या परिसराच्या जवळच श्रीमलंग गडाचा भाग येतो. या भागातून बिबळ्या आला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र बिबळ्याच्या दर्शनानं या भागात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

 

Leave a Comment

%d bloggers like this: