जिल्ह्यात गोवर बाधितांची संख्या ११० वर

जिल्ह्यात गोवरची साथ वाढत असून गोवर बाधितांची संख्या आता ११० झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं घरोघरी जाऊन बालकांचे सर्वेक्षण करण्यात येत असून गोवर प्रतिबंधक लस घेण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. यामध्ये भिवंडीत गोवर बाधितांची संख्या लक्षणीय असून ती आता ४४ वर गेली आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या सर्वेक्षणात १२०६ संशयित आढळून आले होते त्यापैकी ८८८ जणांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यात ११० जणं गोवर बाधित असल्याचं निष्पन्न झालं आहे. गोवर बाधितांसाठी हेल्पलाईन सेवाही सुरू करण्यात आली असून नागरिकांनी तात्काळ ७३०६३ ३०३३० या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलं आहे.

 

Leave a Comment

%d bloggers like this: