जिल्ह्यात कोरोनाचे ९ नवे रूग्ण

जिल्ह्यात कोरोनाचे ९ नवे रूग्ण आढळले. सध्या जिल्ह्यात ११० अक्टीव्ह रूग्ण आहेत. तर आत्तापर्यंत ११ हजार ९६७ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात २ रूग्ण आढळले. सध्या २५ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत २ हजार १६४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये एकही रूग्ण नाही. सध्या ८ रूग्ण उपचार घेत आहेत तर आत्तापर्यंत २ हजार ९६२ रूग्ण दगावले आहेत.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ७ रूग्ण आढळले. सध्या ५७ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत २ हजार ५७ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये एकही रूग्ण नाही. सध्या ४ अॅक्टीव्ह रूग्ण आहेत तर आत्तापर्यंत १ हजार ४०७ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज ० रूग्ण, सध्या २ रूग्ण उपचारार्थ दाखल आहेत. आत्तापर्यंत ६६६ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ० रूग्ण, सध्या ६ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ४८५ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज ० रूग्ण तर ५ रूग्ण उपचार असून आत्तापर्यंत ३८९ जणांचा मृत्यू झाला आणि
ठाणे ग्रामीणमध्ये ० रूग्ण, सध्या ३ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत १ हजार २५७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading