भिवंडी- निजामपूर महापालिकेच्या हद्दीत वाहतूक मार्गात बदल

भिवंडी निजामपुरा शहर महापालिका अंतर्गत तहसिलदार ऑफिस  ते शांतीनगर चौक दरम्यान दोन्ही वाहिनीवर सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम करण्यात येणार असून रस्त्याचे खोदकाम करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करून पर्यायी मार्गाने वळविण्यात आली  असल्याची माहिती  ठाणे शहर वाहतूक विभाग पोलीस उप आयुक्त  विनयकुमार राठोड यांनी दिली आहे.

प्रवेश बंद :-  तहसिलदार ऑफिस (दिघे चौक) ते अमजदिया मस्जिद पर्यंत दुचाकी, तीन चाकी व लहान वाहनां करीता एकेरी वाहतूक  करण्यात येत आहे. नमूद मार्गावरुन तहसिलदार ऑफिस (दिघे चौक) कडून अमजदिया मस्जिदकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना दिघे चौक येथे ‘प्रवेश बंद’ करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग: – सदरची वाहने तहसिलदार ऑफिस (दिघे चौक) ते नागाव मार्गे तसेच तहसिल ऑफिस (दिघे चौक) ते मुरलीधर कम्पाउंड कडून अमजदिया मस्जिद मार्गे इच्छित स्थळी जातील.

 प्रवेश बंद :- शांतीनगर के. जी. एन. चौक येथून दिघे चौकाकडे जाणाऱ्या जड – अवजड वाहनांना अमजदिया मस्जिद येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग :- सदरची वाहने शांतीनगर के. जी. एन. चौक येथून वफा जंक्शन कडून डावीकडे वळण घेवून अमजदिया मस्जिद समोरून सुभाषनगर मार्गे बाबला कंपाउंड व मुरलीधर कंपाउंड मार्गे तसेच अमजदिया मस्जिद येथून नागाव मार्गे इच्छित स्थळी जातील

प्रवेश बंद :- शांतीनगर के.जी. एन. चौक येथून आनंद दिघे चौककडे जाणाऱ्या लहान वाहनांना (दुचाकी, तीन चाकी)  पंचायत समिती क्वॉर्टर्स येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग :- सदरची वाहने शांतीनगर के.जी. एन चौक येथून पंचायत समिती क्वॉर्टर्स मार्गे डावीकडे वळन घेवून साईनगर मार्गे अशोकनगर गेट नं. 1 व नं. 2 येथून इच्छित स्थळी जातील.

ही वाहतूक अधिसूचना रस्त्याचे काम सुरु झाल्यापासून ते काम पूर्ण होई पर्यंत अंमलात राहिल. पोलीस वाहने, फायर ब्रिगेड, रुग्णवाहिका, ग्रीन कॉरीडोर, ऑक्सीजन गॅस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना लागू राहणार नाही, असे ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त विनयकुमार राठोड यांनी कळविले आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading