प्रतिबंधित पानमसाल्याचा १ कोटी ८ लाखांचा साठा अन्न आणि औषध प्रशासनानं केला जप्त

ठाणे -मुंबईकडे विक्रीसाठी घेऊन जात असलेल्या प्रतिबंधित पानमसाल्याचा एकूण १ कोटी ८ लाखांचा साठा अन्न आणि औषध प्रशासनानं जप्त केला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या ठाणे कार्यालयास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे आंबाडी – भिवंडी रोडवर टाटा आयशर या वाहनातून प्रतिबंधित अन्नपदार्थ घेऊन जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे कवाड येथून हा साठा जप्त करण्यात आला. यामध्ये विमल पानमसाला, शुद्ध प्लस पानमसाला, व्ही -1 तंबाखू, नावी तंबाखू,यांचा सुमारे १ कोटी ८ लाख रूपयांचा साठा आढळून आला. हा प्रतिबंधित अन्नपदार्थाचा साठा ताब्यात घेऊन भिवंडी तालुका पोलीस स्टेशनमध्ये ट्रकचा ड्राइव्हर – परमेश्वर ढाकरगे, वाहनाचे मालक राजेश शेटीया, तसंच राजकुमार सपाटे, शौकत पठाण आणि राजेश गुप्ता यांच्याविरूध्द गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading