जिल्हाधिकारी कार्यालयातील लिफ्टमध्ये चार ते पाच जण अडकल्यामुळे काहीसा गोंधळ

जिल्हाधिकारी कार्यालयातील लिफ्टमध्ये काल चार ते पाच जण अडकल्यामुळे काहीसा गोंधळ उडाला होता. जिल्हाधिकारी कार्यालयात मोठी ये-जा असते. त्यातच सोमवारमुळे कार्यालयात गर्दी होती. दुपारच्या सुमारास सततच्या ये-जा मुळे अचानक ही लिफ्ट मध्येच थांबली. त्यामुळे आतल्या प्रवाशांनी आतून मदतीसाठी आरडाओरडा सुरू केला. ही आरडाओरड ऐकून कार्यालयीन सेवक मदतीसाठी धावले आणि त्यांनी आत अडकलेल्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या प्रयत्नांमुळे काही वेळातच आतमध्ये अडकलेल्यांची सुटका झाली. त्यावेळी लिफ्टमधून बाहेर पडलेल्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading