आमदार संजय केळकर यांच्या आमदार निधीतून महाराष्ट्र विद्यालय आणि चरर्ई येथील ब्राम्हण विद्यालयास प्रोजेक्टर

आमदार संजय केळकर यांच्या आमदार निधीतून महाराष्ट्र विद्यालय आणि चरर्ई येथील ब्राम्हण विद्यालयास प्रोजेक्टर देण्यात आले. ठाण्यातील 10 शाळांना केळकर यांनी त्यांच्या आमदार निधीतून असे प्रोजेक्टर दिले आहेत. मुलांच्या शिक्षणाकारिता आवश्यक त्या बाबींची पूर्तता करण्यासाठी सदैव प्रयत्नशील असू असे केळकर यांनी यावेळी बोलताना सांगितले. लॉकडाऊन काळातही त्यांनी शेकडो गरीब, गरजू शालेय विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणाकारिता स्मार्ट फोन चे मोफत वाटप केले होते. शिवाय संस्कार संस्थेच्या माध्यमातून 1 ली ते 10 वी च्या विद्यार्थ्यांकारिता “स्टडी क्लाऊड” ही मोफत शिक्षण प्रणाली सुरु केली असून त्याचा उपयोग शालेय विद्यार्थ्यांना होत आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading