साडेपाच लाखांहून अधिक रूपयांची फसवणूक करणा-या तोतया सहाय्यक पोलीस निरिक्षकास अटक

साडेपाच लाखांहून अधिक रूपयांची फसवणूक करणा-या तोतया सहाय्यक पोलीस निरिक्षकास कळवा पोलीसांनी अटक केली. आर एल जगताप सहाय्यक पोलीस निरिक्षक अशी नेमप्लेट असलेली व्यक्ती आणि त्याच्या साथीदाराने कळव्यातील गणपतीपाडा येथे सुशीलकुमार भारती यांची रिक्षा अडवून त्याच्याकडून मोबाईल घेऊन बिट कॉईन अॅपमधून ५ लाख ७३ हजारांची रक्कम स्वत:च्या खात्यावर ट्रान्सफर करून घेतली. या घटनेची तक्रार भारती याने पोलीसांकडे केली होती. त्यानंतर पोलीसांनी तपास करून कशेळी गाव परिसरातून रामदास जगताप याला ताब्यात घेतले आणि त्याची चौकशी केली असता त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. पोलीसांनी त्याच्याकडून १ लाख ४० हजार रूपये रोख आणि डॅटसन रेडीगो कार असा ३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. जगताप हा तोतया पोलीस म्हणून समाजात वावरून लोकांची फसवणूक करत असून या अट्टल गुन्हेगारास अटक करून कळवा पोलीसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading