गोवर रूग्णांसाठी २४ तास वाँर रुम कार्यरत

संशयित गोवरच्या रुग्णांना २४ तास वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने रुग्णांसाठी २४ तास कार्यरत असणारी हेल्पलाईन सुविधा उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली. लहान मुलांना गोवर सदृश्य लक्षणे आढळल्यास रूग्णांनी त्वरीत ७३०६३ ३०३३० या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. या हेल्पलाईन क्रमांकावर रुग्णांना २४×७ कार्यरत असलेल्या वॅार रुम मधील वैदयकिय अधिकाऱ्यांचे त्वरित मार्गदर्शन उपलब्ध होईल. तसंच जवळच्या आरोग्य केंद्रांकडून आवश्यक ती वैद्यकीय सेवा, औषधे उपलब्ध करून देण्यात येतील. नागरिकांनी घाबरून न जाता त्वरित महापालिकेच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading