टिसाचे संस्थापक मधुसुदन खांबेटे यांचे आज सकाळी दु:खद निधन

टिसाचे संस्थापक मधुसुदन खांबेटे यांचे आज सकाळी दु:खद निधन झाले. ते ९१ वर्षांचे होते. टिसा आणि कोसिआचे संस्थापक तसंच जनी जनार्दन सेवा समितीचे ते अध्यक्ष होते. आप्पा खांबेटे यांनी शहरातील ४-५ उद्योजकांना बरोबर घेऊन १९७४ साली ठाणे स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन म्हणजेच टीसाची स्थापना केली. खांबेटे यांच्या प्रयत्नामुळेच टीसाला कार्यालयासाठी अवघ्या १ रूपया चौरस मीटर दरानं प्लॉट मिळाला. १९७८ मध्ये त्यांनी पहिली लघुउद्योजक परिषद आयोजित केली. १९९० मध्ये लघुउद्योजकांचे प्रश्न सोडवण्यासाठी चेंबर ऑफ स्मॉल इंडस्ट्रीज असोसिएशन म्हणजे कोसिआची स्थापना त्यांनी १९९० मध्ये केली. लघुउद्योजकांसाठी लढण्यात खांबेटेंनी आपलं जीवन खर्च केलं. ठाणे महापालिकेनं त्यांचा ठाणे भूषण पुरस्कार देऊन गौरव केला होता. कोरोना काळातही त्यांनी आरोग्य सैनिक, पोलीस आणि प्रशासकीय कर्मचा-यांना मोठं सहकार्य केलं. उद्या सकाळी 7.30 ते 11.30 ह्या वेळेत त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी वागळे इस्टेट येथील टिसा हाऊस येथे ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, नातवंडे जावई असा परिवार आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading