अलिबागमधील राज्यस्तरीय खो खो स्पर्धेसाठी श्री मावळी मंडळचे प्रणय कमले यांची प्रशिक्षक पदी निवड

ठाण्यातील मावळी मंडळ ही शालेय क्रीडा स्पर्धांसाठी अग्रमानांकित संस्था असून या संस्थेतील क्रीडा प्रशिक्षक प्रणय कमले यांची अलिबाग येथे होणार्‍या राज्यस्तरीय कुमार आणि मुली गटाच्या स्पर्धेकरिता मावळी मंडळचे खो खो संघाच्या ठाणे जिल्हा कुमार गटाच्या प्रशिक्षकपदी निवड करण्यात आली आहे.
प्रणय कमले हे मावळी मंडळ संस्थेच्या क्रीडा प्रशिक्षकपदी कार्यरत असून ते कबड्डी, खो खो, अ‍ॅथलेटिक्स आदी विविध खेळांसाठी छोट्यांपासून कुमारवयीन गटातील मुलांना प्रशिक्षण देतात. त्यांच्या प्रशिक्षण काळात संस्थेने अनेक राष्ट्रीय, राज्य आणि आंतरशालेय स्पर्धांमध्ये यश संपादन केले आहे. अलिबाग येथे होणार्‍या राज्यस्तरीय कुमार गटाच्या स्पर्धेकरिता आपल्या श्री मावळी मंडळ च्या कुमार संघातील शुभम जाधव आणि तनिष फाटे ह्या दोन खेळाडूंची ठाणे जिल्हा कुमार गटाच्या संघात निवड झाली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading