जिल्ह्यात कोरोनाचे २० नवे रूग्ण

जिल्ह्यात कोरोनाचे २० नवे रूग्ण आढळले. सध्या जिल्ह्यात १४८ अक्टीव्ह रूग्ण आहेत. तर आत्तापर्यंत ११ हजार ९६७ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात ६ रूग्ण आढळले. सध्या ४९ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत २ हजार १६४ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये १ रूग्ण आढळला. सध्या १८ रूग्ण उपचार घेत आहेत तर आत्तापर्यंत २ हजार ९६२ रूग्ण दगावले आहेत.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज ९ रूग्ण आढळले. सध्या ४६ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत २ हजार ५७ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज १ रूग्ण आढळला. सध्या ९ अॅक्टीव्ह रूग्ण आहेत तर आत्तापर्यंत १ हजार ४०७ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज १ रूग्ण, सध्या ७ रूग्ण उपचारार्थ दाखल आहेत. आत्तापर्यंत ६६६ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ० रूग्ण, सध्या ६ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ४८५ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज १ रूग्ण तर ८ रूग्ण उपचार असून आत्तापर्यंत ३८९ जणांचा मृत्यू झाला आणि
ठाणे ग्रामीणमध्ये १ रूग्ण, सध्या ५ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत १ हजार २५७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

%d bloggers like this: