बालमित्रांना काही क्षण आनंदात घालवता यावेत याकरिता बालदिनाचे औचित्य साधून विहंग चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा परिषा सरनाईक आणि रोटरी क्लब ऑफ ग्रीन सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. उपवन तलावाजवळील खळे उद्यानात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमामध्ये ४ ते १२ वर्षांपर्यंतच्या लहान मुलांनी सहभाग घेतला होता. कार्यक्रमात कार्टून कॅरेक्टर्स, जंम्पींग जॅक, विविध प्रकारचे खेळ, सोलो डान्स, ग्रुप डान्स करून लहान मुलांनी मनोरंजनाचा आनंद घेतला. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे बालकलाकार मायरा वायकुळ हिने डान्स करून लहान मुलांना मंत्रमुग्ध केले. तसेच या कार्यक्रमात जिद्द शाळेची स्पेशल मुले देखील सहभागी झाली होती.